अनुश्रीच्या जन्मामुळे माझे आयुष्याबद्दलचे विचार बदलून गेले. ब्लॅक अँड व्हाइटमध्ये ग्रे असतो, याची जाणीव झाली!
एक आई म्हणून स्वतःची कल्पना करणं आणि त्या कल्पनेला सत्यात उतरवण्याचा निर्णय घेणं, हे एका अपंग स्त्रीसाठी एखाद्या साहसकृत्यापेक्षा कमी नाही. अनुश्रीचा जन्म ही माझ्या आयुष्यातली अशी घटना आहे, ज्यानंतर माझे आयुष्याबद्दलचे विचारच बदलून गेले. ब्लॅक अँड व्हाइटमध्ये ग्रे असतो, याची जाणीव झाली. तशी ती निडर आहे, पण बेपर्वा नाही. स्वत:ला जपून ती सगळ्या गोष्टी करते.......